जी.एस्. आमोणकर विद्यामंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे प्राथमिक विभागाच्या शिक्षिकांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

जी.एस्. आमोणकर विद्यामंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे प्राथमिक विभागाच्या शिक्षिकांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

दिनांक २ ऑक्टोबर रोजी शाळेत गांधी जयंती साजरी करून नंतर प्राथमिक विभागाच्या दोन शिक्षिका सौ. अपर्णा देसाई व श्रीमती आनंदी कामत यांच्यासाठी सेवानिवृत्तीपर कार्यक्रम ठेवण्यात आला होता. “माता आणि माती फरक आहे वेलांटीचा, एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते.” असे बोलत सौ. दीपाली नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सर्व मान्यवरांचे स्वागत केले. तद्नंतर प्रार्थना व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर शाळेच्या कमिटीचे अध्यक्ष अॅड. संजय उसगांवकर यांनी दोन्ही शिक्षिकांबद्दल आपले विचार मांडताना म्हटले की त्या दोन्ही शिक्षिकांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने व मायेच्या स्पर्शाने आपली यशस्वी कारकीर्द घडवली आहे. नंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गायत्री सिरसाट यांनी आपले विचार मांडत असताना म्हटले की, जसा एक माळी रोपट्यांना खत-पाणी घालून त्याची व्यवस्थित निगा राखून, त्याचे पालन पोषण करतो, तसाच शिक्षकही विद्यार्थ्यांबाबत तीच भूमिका साकारत असतो.
शाळेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री. राज आमोणकर, व्यवस्थापक श्री. मोहन कौल, सदस्य श्री. गुरुदास भक्ता, पालक शिक्षक संघाचे सदस्य श्री. विजय भिके व शाळेच्या शिक्षक वर्गापैकी काही शिक्षकांनी प्राथमिक विभागाच्या सत्कार मूर्तींबद्दल आपले मनोगत व्यक्त करत म्हटले की, कोणत्याही शाळेचा पाया प्राथमिक विभागाच्या शिक्षकांमुळे भक्कम होत असतो.
तद्नंतर सत्कार समारंभ आरंभ करण्यात आला. मान्यवरांच्याहस्ते सौ. अपर्णा देसाई व श्रीमती आनंदी कामत यांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन पुन्हा एकदा शाळेत सत्कार करण्यात आला. त्यानंतर दोन्ही शिक्षिकांनी आपल्या शाळेतील सुंदर आठवणींना उजळणी देत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी २०१०-११ या सालच्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद घेतले. शेवटी सौ. सावित्री घाडी यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.

G. S. Amonkar Vidya Mandir bids farewell to the retiring Teachers.

G. S. Amonkar Vidya Mandir bids farewell to the retiring Teachers.

The New Goa Educational Trust and the School Managing Committee of G. S. Amonkar Vidya Mandir, Mapusa, felicitated two of its retiring teachers of the Primary section namely Mrs Aparna Dessai and Mrs. Anandi Kamat in a special programme on 2nd October, 2021; for their long and dedicated service to the school.

The programme started with a prayer by the Primary teachers. This was followed by speeches. The trustees _ Adv. Sanjay S Usgaonkar (Chairman of the managing committee), Dr. Raj S Amonkar ( the Executive Trustee), Shri Gurudatta D Bhakta and Shri Mohan Koul, highlighted the contribution of both the teachers and appreciated them for their hard work and dedication.The school Headmistress Mrs. Gayatri Shirsat and teachers also expressed their wishes to the retiring teachers. Thereafter the retiring teachers addressed the gathering. The programme was also attended by the trustee members, PTA Chairmen of the Primary and Secondary , Asst. Headmistress Mrs Pooja Dalvi, ex-students, teaching and non-teaching staff. The programme concluded with a prayer song. The programme was compered by teacher Mrs. Deepali Naik.

जी.एस्. आमोणकर विद्यामंदिरात दोन प्राथमिक शिक्षिकांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

 

 

 

 

जी.एस्. आमोणकर विद्यामंदिरात दोन प्राथमिक शिक्षिकांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

25 सप्टेंबर रोजी प्राथमिक विभागाच्या पालक-शिक्षक संघातर्फे सौ. अपर्णा देसाई आणि श्रीमती आनंदी कामत ह्या प्राथमिक शिक्षिकांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ करण्यात आला. सौ. दीपाली नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका श्रीमती अंजली कामत आणि श्रीमती स्मिता पेडणेकर यांच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल कौतुक सोहळा करण्यात आला. यावेळी प्राथमिक विभागाच्या मुलांनी पाठवलेल्या भेटकार्ड व हस्तकला कृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले. तसेच पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक विभागाच्या शिक्षिकांनी खाद्यपदार्थ ठेवून पौष्टिक आहाराविषयी जागृती केली. पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. अनुज साळकर, उपाध्यक्षा सौ. निवेदिता चोडणकर, उपसचिव सौ. संजना कळंगुटकर, सभासद सौ. प्रज्ञा नास्नोडकर आणि श्री. नवनाथ केळकर यांनी सौ. अपर्णा देसाई आणि श्रीमती आनंदी कामत तसेच श्रीमती अंजली कामत आणि श्रीमती स्मिता पेडणेकर यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या समितीचे अध्यक्ष अॅड. संजय उसगांवकर, मुख्याध्यापिका सौ. गायत्री सिरसाट, उपमुख्याध्यापिका सौ. पूजा दळवी आणि शिक्षिकांनी सत्कारमूर्तींविषयी आपले मनोगत व्यक्त केले. अशाप्रकारे सौ. सावित्री घाडी यांनी मान्यवरांचे आभार मानले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

जी.एस. आमोणकर विद्यामंदिरातील दोन शालेय कर्मचार्‍यांचा सन्मान

 

जी.एस. आमोणकर विद्यामंदिरातील दोन शालेय कर्मचार्‍यांचा सन्मान

कोरोना महामारीच्या या संकटात बहुसंख्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती कोविड सेंटरला करण्यात आली होती. यामध्ये जी. एस. आमोणकर विद्यामंदिराचे दोन कर्मचारी श्री. लक्ष्मीकांत ज्ञानेश्वर च्यारी आणि श्री. सागर मनोहर साखळकर यांना कोरोना योद्धा अंतर्गत कोरोना नियुक्तीचे काम देण्यात आले होते. श्री. लक्ष्मीकांत ज्ञानेश्वर च्यारी यांनी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कोविड ड्युटी करत पुन्हा संध्याकाळी ५ वाजता शाळेत येऊन उशिरापर्यंत शालेय कामकाज पूर्ण करण्याचा जणू ध्यासच घेतला होता, त्यामुळे शिक्षकांना त्यांचे वेतन वेळेवर मिळणे सोपस्कर झाले. दोन्ही कामगिरी श्री. च्यारी यांनी यशस्वीरित्या पार पाडली. तसेच श्री. सागर मनोहर साखळकर हे अजूनही कोविड ड्युटी करत आहे. त्यामुळे त्यांचे शालेय कार्यालयीन कामकाज शालेय कर्मचारी सौ. निलांगी साळगांवकर हिने पूर्णत्वास नेत यशस्वी कामगिरी केली. त्यामुळे त्यांच्या या निष्ठेमुळे कार्यालयीन कामे पूर्ण झाली. त्यांच्या या कामाचे कौतुक म्हणून शाळेतर्फे श्री. लक्ष्मीकांत च्यारी आणि निलांगी साळगांवकर यांना मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे चेअरमन एड. श्री. संजय उसगांवकर सर, मुख्याध्यापिका सौ. गायत्री सिरसाट, उपमुख्याध्यापिका सौ. पूजा दळवी आणि सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होता. त्यांच्या या कामाचे कौतुक सर्वत्र होत आहे.

our Beloved Headmistress Mrs Gayatri Shirsat on receiving from the Rotary Club of Mapusa’The Nation Builder Award -2021′

 

 

The Management, staff and students of G.S.Amonkar Vidya Mandir wish to congratulate our Beloved Headmistress Mrs Gayatri Shirsat on receiving from the Rotary Club of Mapusa’The Nation Builder Award -2021′ on the occasion of Teachers’ Day.
Your dedicated service to the student community with diligence and devotion is appreciated by all. May this, achievement lead to more noteworthy accomplishments in the years to come

७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जी. एस. आमोणकर विद्या मंदिरात पालक-शिक्षक संघातर्फे कार्यक्रम

 

७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जी. एस. आमोणकर विद्या मंदिरात पालक-शिक्षक संघातर्फे कार्यक्रम

७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पालक-शिक्षक संघातर्फे पूर्वप्राथमिक विभागात चित्रकला स्पर्धा आणि प्राथमिक विभागात कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. शाळेतील ९६ मुलांनी या स्पर्धेत भाग घेऊन ती यशस्वीरित्या पार पाडली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गायत्री सिरसाट यांनी मुलांना मौलिक मार्गदर्शन केले. पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. अनुज साळकर यांनी मुलांचे कौतुक केले. तद्नंतर प्राथमिक विभागाच्या शिक्षिका सौ. ममता सावंत यांनी बक्षीसप्राप्त मुलांची नावे वाचली. यशस्वी मुलांना ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रके देण्यात आली. सदर कार्यक्रमात पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ. निवेदिता चोडणकर आणि सभासद श्री. नवनाथ केरकर उपस्थित होते. प्राथमिक विभागाच्या शिक्षिका सौ. सावित्री घाडी यांनी उपस्थितांचे आभार मानले.