जी.एस्. आमोणकर विद्यामंदिरात दोन प्राथमिक शिक्षिकांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

 

 

 

 

जी.एस्. आमोणकर विद्यामंदिरात दोन प्राथमिक शिक्षिकांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

25 सप्टेंबर रोजी प्राथमिक विभागाच्या पालक-शिक्षक संघातर्फे सौ. अपर्णा देसाई आणि श्रीमती आनंदी कामत ह्या प्राथमिक शिक्षिकांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ करण्यात आला. सौ. दीपाली नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका श्रीमती अंजली कामत आणि श्रीमती स्मिता पेडणेकर यांच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल कौतुक सोहळा करण्यात आला. यावेळी प्राथमिक विभागाच्या मुलांनी पाठवलेल्या भेटकार्ड व हस्तकला कृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले. तसेच पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक विभागाच्या शिक्षिकांनी खाद्यपदार्थ ठेवून पौष्टिक आहाराविषयी जागृती केली. पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. अनुज साळकर, उपाध्यक्षा सौ. निवेदिता चोडणकर, उपसचिव सौ. संजना कळंगुटकर, सभासद सौ. प्रज्ञा नास्नोडकर आणि श्री. नवनाथ केळकर यांनी सौ. अपर्णा देसाई आणि श्रीमती आनंदी कामत तसेच श्रीमती अंजली कामत आणि श्रीमती स्मिता पेडणेकर यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या समितीचे अध्यक्ष अॅड. संजय उसगांवकर, मुख्याध्यापिका सौ. गायत्री सिरसाट, उपमुख्याध्यापिका सौ. पूजा दळवी आणि शिक्षिकांनी सत्कारमूर्तींविषयी आपले मनोगत व्यक्त केले. अशाप्रकारे सौ. सावित्री घाडी यांनी मान्यवरांचे आभार मानले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.