जी. एस्. आमोणकर विद्यामंदिरात आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा साजरी

 

 

 

 

जी. एस्. आमोणकर विद्यामंदिरात आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा साजरी

पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक विभागातर्फे आषाढी एकादशी ‘जी. एस्. आमोणकर विद्यामंदिरात’ साजरी करण्यात आली त्यावेळी सर्व शिक्षिकांनी मिळून मुलांसाठी ‘रंगांची ओळख’ यावर एक खेळ घेतला. सर्वांनी या खेळाचा आनंद लुटला. त्यानंतर सर्वांनी ‘दिंडी’ सादर केली. अशाप्रकारे या दोन्ही कृतींची चित्रफीत काढून ती पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुलांना पाठवली.

तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त ‘गुरूने दिला ज्ञानरूपी वसा’ ही प्रार्थना सर्व शिक्षिकांनी सादर केली. तसेच प्राथमिक विभागाच्या मुलांनी आपापल्या घरी आई-वडिलांना ओवाळतानाचा फोटो पाठवला. त्यांची चित्रफीत करुन ती मुलांना पाठवली. मुलांनी ह्या भ्रमणध्वनीद्वारे वरील उत्सवांचा आनंद लुटला. ह्या कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन ॲड. श्री. उसगांवकर सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गायत्री सिरसाट तसेच उपमुख्याध्यापिका पूजा दळवी यांचे सहकार्य लाभले.