जी. एस. आमोणकर विद्यामंदिरातील एन.सी.सी क्षेत्रातील प्रशिक्षिका व विद्यार्थी पुरस्कृत

 

जी. एस. आमोणकर विद्यामंदिरातील एन.सी.सी क्षेत्रातील प्रशिक्षिका व विद्यार्थी पुरस्कृत

नुकताच वन गोवा नेवल युनिट चा वार्षिक इन्स्पेक्शन व पारितोषिक वितरण समारोह पेडेम येथील कार्यालयात पार पडला. जी.एस. आमोणकर विद्यामंदिरातील एन.सी.सी प्रशिक्षिका व अधिकारी सेकंड ऑफिसर अमिता हुम्रस्कर यांना एन.सी.सी ग्रुप कमांडर कर्नल श्रीनिवास यांच्या हस्ते, आपल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कृत करण्यात आले.
तसेच कनिष्ठ विभागातील एन.सी.सी कॅडेट तितिक्ष सर्वज्ञ पाटील याला मानधन व स्मृतिचिन्ह देऊन उत्कृष्ट कॅडेट म्हणून पुरस्कृत करण्यात आले.
जी. एस. आमोणकर विद्यामंदिरातील एन.सी.सी शाखेच्या अधिकारी, सेकंड ऑफिसर अमिता हुम्रस्कर या गेली 13 वर्षे शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असून एन.सी.सी. मध्ये निस्वार्थी व उत्तम प्रशिक्षण देत आहेत, याचाच हा एक देखावा.
शाळेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष एड. संजय उसगांवकर, मुख्याध्यापिका सौ. गायत्री सिरसाट, उपमुख्याध्यापिका सौ. पूजा दळवी व इतर सर्व शिक्षकांनी एन.सी.सी शाखेचे अधिकारी सेकंड ऑफिसर अमिता हुम्रस्कर व कॅडेट सर्वज्ञ पाटील यांचे भरभरून कौतुक केले तसेच वन गोवा नेवल युनिटचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन डीन मेंडोंसा व कमांडर रिजी कृष्णन यांनी पुरस्कृतांचे कौतुक केले.