जी.एस. आमोणकर विद्यामंदिरातील दोन शालेय कर्मचार्‍यांचा सन्मान

 

जी.एस. आमोणकर विद्यामंदिरातील दोन शालेय कर्मचार्‍यांचा सन्मान

कोरोना महामारीच्या या संकटात बहुसंख्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती कोविड सेंटरला करण्यात आली होती. यामध्ये जी. एस. आमोणकर विद्यामंदिराचे दोन कर्मचारी श्री. लक्ष्मीकांत ज्ञानेश्वर च्यारी आणि श्री. सागर मनोहर साखळकर यांना कोरोना योद्धा अंतर्गत कोरोना नियुक्तीचे काम देण्यात आले होते. श्री. लक्ष्मीकांत ज्ञानेश्वर च्यारी यांनी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कोविड ड्युटी करत पुन्हा संध्याकाळी ५ वाजता शाळेत येऊन उशिरापर्यंत शालेय कामकाज पूर्ण करण्याचा जणू ध्यासच घेतला होता, त्यामुळे शिक्षकांना त्यांचे वेतन वेळेवर मिळणे सोपस्कर झाले. दोन्ही कामगिरी श्री. च्यारी यांनी यशस्वीरित्या पार पाडली. तसेच श्री. सागर मनोहर साखळकर हे अजूनही कोविड ड्युटी करत आहे. त्यामुळे त्यांचे शालेय कार्यालयीन कामकाज शालेय कर्मचारी सौ. निलांगी साळगांवकर हिने पूर्णत्वास नेत यशस्वी कामगिरी केली. त्यामुळे त्यांच्या या निष्ठेमुळे कार्यालयीन कामे पूर्ण झाली. त्यांच्या या कामाचे कौतुक म्हणून शाळेतर्फे श्री. लक्ष्मीकांत च्यारी आणि निलांगी साळगांवकर यांना मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे चेअरमन एड. श्री. संजय उसगांवकर सर, मुख्याध्यापिका सौ. गायत्री सिरसाट, उपमुख्याध्यापिका सौ. पूजा दळवी आणि सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होता. त्यांच्या या कामाचे कौतुक सर्वत्र होत आहे.