जी. एस. आमोणकर विद्यामंदिरात वनमहोत्सव साजरा

जी. एस. आमोणकर विद्यामंदिरात वनमहोत्सव साजरा

दिनांक २८ जून २०२१ रोजी जी. एस. आमोणकर विद्यामंदिर म्हापसा येथे वार्षिक वनमहोत्सव दिन साजरा करण्यात आला. या दिवशी शाळेच्या परिसरात वेगवेगळी फुलझाडे तसेच तुळशीरोपण करण्यात आले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गायत्री सिरसाट यांच्या हस्ते रोप लावून या वृक्षरोपणाचे सुरुवात झाली. त्यानंतर शाळेच्या शारीरिक शिक्षिका सौ. उत्कर्षा गावडे, शारीरिक शिक्षक श्री नरेंद्र परब व एन.सी.सी प्रशिक्षिका सौ. अमिता हुम्रस्कर यांनी वृक्षारोपण केले