म्हापशातील जी. एस. आमोणकर विद्यालयाचा १०० टक्के निकाल

जी.एस. आमोणकर विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष (२०२०-२१) दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून १७६ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. ६६ विद्यार्थी विशेष श्रेणीत, ६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ४० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
कुमार जय अजित झांट्ये ह्याने ९८.६७% मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. कुमारी सृष्टी ‍सोमा राऊळ ही ९७.१७% मिळवून द्वितीय आली तर बसुराज हनुमंत पुजारी व चैत्राली दिपक परब ह्या दोघांनी ९६.३३% मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल जी.एस. आमोणकर विद्यालयाचे अध्यक्ष अॅड. श्री संजय उसगांवकर, शाळेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री राज आमोणकर, शाळेचे व्यवस्थापक श्री मोहन कौल, मुख्याध्यापिका सौ. गायत्री सिरसाट, उपमुख्याध्यापिका सौ. पूजा दळवी, शिक्षक वर्ग आणि पालक शिक्षक संघाकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.